ग्राम हुनर फेलोशीप ही बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, केज आणि धारूर भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व गावातील विद्यार्थी यांच्या शैक्षणिक परिवर्तनासाठी आहे. ज्या तरुण-तरुणीना ग्रामीण भागातील शैक्षणिक बदलासाठी काम करण्याची इच्छा आहे असे तरुण-तरुणी या फेलोशीप साठी अर्ज करू शकतात.
पात्रता:- 1) कोणत्याही शाखेचा पदवीधर. 2) संगणकाचे ज्ञान आवश्यक. 3) इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. 4) उत्तम संवाद कौशल्य. 5) वयोमर्यादा- 21 ते 30 वर्षे.
प्राधान्य:- 1) शिकवीण्याचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांस प्राधान्य राहिल. 2) ग्रामीण भागात दोन वर्ष पूर्ण वेळ काम करण्याची तयारी असावी.
जबाबदाऱ्या:- 1) दररोज शाळेवर 2 तास मुलांना शिकवणे. 2) शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे. 3) पालकांमध्ये शैक्षणिक जागृती निर्माण करणे. 4) लोकसहभागातून शैक्षणिक चळवळ उभी करणे.
महत्वाचे :- फॉर्म भरताना खालील अकाउंट वर रुपये 100 पाठवून त्याचा स्क्रिनशॉट फॉर्म वर अपलोड करायचा आहे.
Payment Details:- Gramurja Human Development Foundation A/c: 920020011818112 IFSC: UTIB0001437 Bank : Axis Bank Branch : Sadashiv peth, Pune.
संस्थेचा पत्ता:- ग्रामऊर्जा फाउंडेशन, विद्युत नगर, पाण्याच्या टाकी जवळ, बीड रोड अंबाजोगाई. 8888955818/ 9657947374